Amravati Teachers Constituency Election | अमरावती शिक्षक निवडणुकीत बंडखोरी : शेखर भोयर, संगीता शिंदे, पवार यांची भाजपमधून हकालपट्टी

नितीन गुडधे यांचेही प्राथमिक सदस्यत्व संपुष्टात
BJP Expels Rebel Leaders Amravati
BJP Expels Rebel Leaders AmravatiPudhari
Published on: 
Updated on: 

BJP Expels Rebel Leaders Amravati

अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची जागा महायुतीमध्ये शिवसेनेला देण्यात आली आहे. शिवसेनेने किरण सरनाईक यांना आपला अधिकृत उमेदवार घोषित केल्यानंतर महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदे आणि सुमित पवार हे पदाधिकारी निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतरही उमेदवारी कायम ठेवून उभे आहेत.

त्यामुळे या तीनही उमेदवारांना महायुतीच्या उमेदवाराविरोधात आपला अर्ज कायम ठेवल्यामुळे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व संपुष्टात आणून सहा वर्षासाठी निष्कासित करण्यात आले आहे. यासह अमरावती जिल्हा ग्रामीण मोर्शीचे सरचिटणीस नितीन गुडधे यांना शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत केलेल्या शिस्तभंगाच्या कृती बद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

BJP Expels Rebel Leaders Amravati
Amravati Accident | नवी बुलेट घेऊन गावी परतताना काळाचा घाला! अमरावती-दर्यापूर मार्गावर ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू 

त्या नोटीसला नितीन गुडधे यांनी दिलेल्या उत्तरादाखलचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांचे प्राथमिक सदस्यत्व संपुष्टात आणून सहा वर्षासाठी निष्कासित करण्यात आले आहे. या बाबत भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार प्रताप अडसड यांनी नोटीसद्वारे संबंधितांना कळविले आहे. या निष्कासनानंतर हे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ते आज ज्या पदावर आहेत त्या पदावरील नियुक्ती आपोआप खारीज झाली असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार अडसड यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news