Vijay Wadettiwar : काँग्रेस एकसंघ, भाजपमध्येच गटबाजी जोरात : विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar : काँग्रेस एकसंघ, भाजपमध्येच गटबाजी जोरात : विजय वडेट्टीवार

नागपूर; पुढारी वत्तसेवा : पक्ष म्हटले की मतभेद गटबाजी येते. काँग्रेस पक्षातही मोठ्या प्रमाणात गटबाजी झाली होती; परंतु आता काँग्रेस एकसंघ आहे. ही कीड भाजपमध्ये सुरू झालेली आहे. उंदराला घुस व्हावं असं वाटतं घुशीला बोका व्हावं. बोक्याला वाटतं की मी त्यापेक्षा चपळ प्राणी होता येईलं का? राजकारणात एखाद्याचा काटा काढला की दुसऱ्याचा काटा काढला जातोच. राजकारणात महाराष्ट्रात ही स्पर्धा सुरू झालेली आहे. आता हे काढण्यासाठी दाबण वापरतात की सुई वापरतात हे येत्या काही दिवसात कळेल असे सूचक विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

विनोद तावडे यांचे राज्यात वाढते महत्व लक्षात घेता त्यांच्या विधानाला राजकीय अर्थ मानला जात आहे. हसन मुश्रीफ यांनी मतदारांना हेलिकॉप्टरमधून आणले जाईल, असे सांगितले. याबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, मतदारांना हेलिकॉप्टरने आणण्यासाठी ७० हजार कोटी त्यांच्याकडे आहेत. राजकारणाला धंदा समजणाऱ्याची भाषा अशीच असणार. हे राजकारण समाजसेवचे व्रत आहे. निवडणूक आयोगाने चौकशी केली पाहिजे. संघ आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देशामध्ये कुठली विचारधारा नाही, म्हणून त्यांचे खासदार घटना बदलण्याच्या गोष्टी करतात. त्यांना संविधान बदलायचे आहे. त्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news