नागपूर : खापरी डेपोतील पेट्रोल टँकर सुरक्षेत रवाना | पुढारी

नागपूर : खापरी डेपोतील पेट्रोल टँकर सुरक्षेत रवाना

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या ट्रक चालकांच्या देशव्यापी संपाचा फटका आता जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व्यवसायाला बसू लागला आहे. ठिकठिकाणी ट्रक,  टँकर वाहतूक खोळंबली होती. यामुळे दुसऱ्या दिवशीही पेट्रोल पंपावर रांगा लागल्याचे दिसून आल्या. पेट्रोल, डिझेल सहज उपलब्ध होत नसल्याने याचा मालवाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे जीवनावश्यक वस्तू व भाजीपाल्याचे दर वाढल्याचे चित्र आज (दि.२)  पहायला मिळाले.

दुसरीकडे नागपुरातील अनेक पंपांवर पेट्रोल नसल्याचे बोर्ड लागले, तर काही ठिकाणी पेट्रोल पंप बंद दिसले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन नेटकर यांनी घेतलेल्या बैठकीनंतर नागरिकांनी घाबरून जाऊ नये, भरपूर साठा पेट्रोल डिझेलचा आपल्याकडे आहे. गरज पडल्यास टँकर्सना पोलीस सुरक्षा दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. खापरी डेपो येथून भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कार्पोरेशनच्या पेट्रोल टॅंकरना पोलिस सुरक्षा पुरविण्यात आली. त्यानुसार तातडीने खापरी येथे पोलीस कुमक पोहोचली व सुरक्षा व्यवस्थेत हे डिझेल पेट्रोल टँकर आपल्या प्रवासाला निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हेही वाचा : 

 

Back to top button