file photo
file photo

मराठ्यांची संख्या 3 कोटी आहे का? तायवाडे यांचा जरांगे-पाटलांना सवाल

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : येत्या २० जानेवारीला आपण पायी चालत निघणार, मुंबईतील पायी मोर्चात ३ कोटी मराठा समाज बांधव सहभागी होईल, असा दावा मराठा समाज नेते, आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. यावर बोलताना ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

मुंबईत घेऊन जाण्यासाठी राज्यात मराठ्यांची संख्या ३ कोटी आहे तरी का? असा सवाल बबनराव तायवाडे यांनी जरांगेना केला आहे. आज तायवाडे यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथील ओबीसी समाजातर्फे सुरू असलेले साखळी उपोषण २७ व्या दिवशी मागे घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, धरसोड मागण्यांच्या प्रवृत्तीमुळे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धार आता कमी झाली आहे, असा टोलाही तायवाडे यांनी यावेळी लगावला. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला, ही घरची शेती आहे का? असेही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा :

logo
Pudhari News
pudhari.news