

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : Nagpur crime ब्रेकअपमधून झालेल्या वादातून मैत्रीणीला बंदूक दाखवल्याची घटना मेडिकलमध्ये २२ नोव्हेंबर रोजी घडली होती. यातील फरार आरोपी विक्की चकोले याला पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तपासात त्याने मुंबईतूनच पिस्तुल खरेदी केल्याचे उघड झाले आहे. त्याच्या जवळून दोन काडतुसांसह पिस्तुल जप्त केले आहे.
दोन वर्षांपूर्वी प्रियंका आणि विक्कीची फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. विक्की त्यावेळी मुंबईत फिल्म सिटीत फायरमन म्हणून काम करीत होता.
विक्की चकोले दारूचे व्यसन असल्याचे कळताच तरुणीने त्याला भेटणे बंद केले होते. यानंतरही .ितिला भेटण्यासाठी विक्की चकोले प्रयत्न करत हाेता. त्याने पिस्तुल घेऊन तिला मेडिकलमधील वाचनालयाजवळ गाठीत तिच्यावर पिस्तुल रोखले हाेते. सुदैवाने यावेळी बंदुकीतून गोळी सुटली नाही.
यवतमाळ येथील मेडिकल कॉलेजमध्ये नुकतीच प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा खून झाल्याची घटना ताजी आहे.दरम्यान ही घटना घडल्याने मेडिकलमधील निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने परिसरात सुरक्षा वाढवण्याची मागणी करणारे निवेदन अधिष्ठात्यांना दिले. मेडिकल परिसरात सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात यावी, सीसीटीव्ही लावण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.