शेतकऱ्याला उर्जादाता बनवण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध : नितीन गडकरी

 नितीन गडकरी 
(File Photo)
नितीन गडकरी (File Photo)

अकोला, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्याला उर्जा दाता बनवण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्याला चांगली बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले. अकोला येथील क्रिकेट क्लबवर शनिवारी (दि. 28) 385 कोटी रुपये खर्चून तयार केलेले भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उड्डाणपूल तसेच संत कंवरराम उड्डाणपूल व शिवर ते रिधोरा या रस्त्याचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी बोलताना गडकरी म्‍हणाले, बार्शीटाकळी रेल्वे गेटवर वरील उड्डाणपूल लवकरच करण्यात येईल. तर डिसेंबरपर्यंत चिखली- अकोला-अमरावती या मार्गाचा लोकार्पण करू, असे आश्वासन दिले. अमरावती ते मलकापूर या महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होवून नवीन वर्षात याचेही लोकार्पण करण्यात येईल.

यावेळी ना.बच्चू कडू यांनी मार्गदर्शन केले. आमदार सावरकर यांनी अकोला रिंग रोड, नवीन विमानतळ तसेच अकोला मार्ग बाबुळगाव मालेगाव डोणगाव याचे राष्ट्रीयीकरण तसेच अकोला डाबकी गायगाव अकोला, गुडधीजवळ रेल्वे लाईनवर अतिरिक्त उड्डाणपूल, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ जवळील राष्ट्रीय महामार्गावर तसेच अकोट फाइल येथील नवीन पूर्णा नदीवर पूल, अंदुरा गावाजवळून पूर्णा नदीवर पूल, रोजगार निर्मितीसाठी मल्टिलॉजिस्टीकपार्कची स्थापना केली जाईल, असे आश्वासन दिले.

अकोला विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्याचे सहकार्य

अकोला शहराच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी आपले नेहमीच सहकार्य असते. रस्ते विकास, जलसंधारण, शेती-व्यापार विकास यासर्व प्रश्नांची सोडवणूक करतानाच अकोला विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण संपूर्ण सहकार्य करु, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news