कोल्हापूर : गोवा सहलीला गेलेल्या चंदगडच्या तरुणांना मारहाण करून लुटले ; महिलेसोबत नग्न व्हिडीओही काढले | पुढारी

कोल्हापूर : गोवा सहलीला गेलेल्या चंदगडच्या तरुणांना मारहाण करून लुटले ; महिलेसोबत नग्न व्हिडीओही काढले

चंदगड : पुढारी वृत्तसेवा : गोवा येथे सहलीसाठी गेलेल्या चंदगड तालुक्यातील ११ तरुणांना ५ अज्ञातांनी व एका महिलेने बेदम मारहाण केली. त्यांच्याकडून पैसे व मोबाईल काढून घेऊन त्यांचा नग्न व्हिडीओ बनवला. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर अज्ञातांच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेत तरुणांनी आपले गाव गाठले; पण झालेल्या प्रकारामुळे सर्वच तरुण गेले दोन दिवस तणावाखाली होते. त्‍यांनी कुणालाच याबाबत सांगितले नाही. मात्र, पीडित तरुणांनी शनिवारी झालेल्या प्रकाराला वाचा फोडली. सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष मळवीकर यांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी रविवारी (दि. २९) म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती ॲड. मळवीकर यांनी दिली.

निर्जनस्थळी तरुणांना मारहाण करून लुटले

चंदगड तालुक्यातील अकरा तरुण गोव्याला सहलीला गेले होते. गुरुवारी ते गावी परत येत असताना गोव्यातील अज्ञातांनी त्यांना बोंडगेश्वर मंदिराशेजारी अडविले. आमच्याकडे जेवण चांगले मिळते, असे सांगत गाडी एका निर्जनस्थळी नेली. त्यानंतर गाडीतील सर्वांना एका हॉटेलच्या खोलीमध्ये कोंडले. त्यांच्याकडून पैसे, मोबाईल, अंगठी व चेन काढून घेतली. त्यानंतरही त्या अज्ञातांचे समाधान न झाल्याने गाडीतील तरुणांना नातेवाईकांकडून ऑनलाईन पैसे मागवून द्या, नाही तर तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणांनी पैसेही दिले.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्‍याची दिली धमकी

दरम्यान, नग्नावस्थेत महिलेसोबत व्हिडीओ बनवले. त्यानंतर तीन ते चार साथीदारांना बोलावून घेतले. त्यांनी तरुणांकडून डाेक्‍याला तेल लावून घेतले व त्याचा व्हिडिओही बनविला. त्यानंतरही त्यांची पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने तरुणांना बेदम मारहाण करून नग्न व्हिडीओ तयार केला. याबाबत कुणाकडेही वाच्यता केल्यास तुमचे नग्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणार व तुम्हाला जिवंतही सोडणार नसल्याची धमकी दिली. त्यानंतर अज्ञातांच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेत तरुणांनी आपले गाव गाठले.

झालेल्या प्रकारामुळे सर्वच तरुणदोन दिवस तणावाखाली होते. त्यामुळे कुणालाच याबाबत सांगितले नाही. मात्र, पीडित तरुणांनी शनिवारी झालेल्या प्रकाराला वाचा फोडली. सामाजिक कार्यकर्ते ॲड. संतोष मळवीकर यांना घडलेला प्रकार सांगितला. निवेदनावर ॲड. संतोष मळविकर, समीर शिंदे, सतीश आपटेकर, सुभाष गावडे, सुभाष गावडे, प्रवीण पाटील, मनोज शिंदे, अभिषेक पाटील, निखिल गावडे, नितीन गावडे, रोहित गावडे, सागर हसूरकर यांच्या सह्या आहेत. अज्ञातांविरोधात चंदगड तालुक्यातील तरूणांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी रविवारी (दि. २९) म्हापसा पोलीस स्थानकात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती ॲड. मळवीकर यांनी दिली.

गोव्याला जायचे की नाही?

गोव्याचा समुद्र किनारा आणि निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी देश – विदेशातून पर्यटक गर्दी करतात. विदेशी पर्यटकही येतात आणि काही दिवस मुक्काम करतात. असे प्रकार घडले तर पर्यटक यापुढे गोव्याला जाताना  विचार करतील. गोवा पोलिसांनी लुटारूंचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी संतोष मळवीकर यांनी केली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button