विदर्भात दिसले सर्वाधिक काळ खग्रास चंद्रग्रहण

खंडग्रास चंद्रग्रहण
खंडग्रास चंद्रग्रहण

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी खंडग्रास सूर्यग्रहणाची पर्वणी लाभल्यानंतर मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रात खंडग्रास चंद्रग्रहण नागरिकांना पाहता आले. विदर्भात सर्वात जास्त वेळ खंडग्रास चंद्रग्रहण दिसून आले. गडचिरोली येथे 1.56 मिनिटे तर चंद्रपुरात 1.54 मिनिटे चंद्रग्रहण पाहता आले. चंद्रपुरातील जनता महाविद्यालयात आणि नागपुरातील रमन विज्ञान केंद्रात खंडग्रास चंद्रग्रहणाचा पाहण्याचा लाभ घेतला.

अरुणाचल प्रदेशात सर्वात जास्त ९८ टक्के खंडग्रास चंद्रग्रहणाची स्थिती होती तर मुंबई मध्ये १३ टक्के चंद्रग्रहणाची स्थिती होती. महाराष्ट्रात हे चंद्रग्रहण सर्वाज जास्त पहाता आले. त्यामध्येही विदर्भात खंडग्राहस चंद्रग्रहणाची पर्वणी येथील नागरिकांना लाभली. विदर्भातील चंदपूर व गडचिरोली हे दोनही ठिकाणी चंद्रग्रहणाच्या द्ष्टीने महत्वाची ठरली.

महाराष्ट्रात गडचिरोली जिह्यातून चंद्रग्रहणाला ५.३० वाजता सुरुवात झाली. ७.२६ मिनिटांनी चंद्रग्रहण संपले. ६० टक्के चंद्रगहण या ठिकाणी दिसले. त्यानंतर विदर्भात चंद्रपुरात ५० टक्के खंडग्रास चंद्रग्रहण दिसले. खंडग्रास चंद्रग्रहण ७.१९ तर छायाकल्प चंद्रग्रहण ७.२० दिसले. १.५४ मिनिटाची पर्वणी चंद्रपुरात पहायला मिळाली. चंदपुरातील जनता महाविद्यालया खंडग्राहस चंद्रग्रहण पहाण्याची सुविधा विदयार्थी व नागरिकांकरीता करण्यात आली होती.

खंडग्रास चंद्रग्रहण प्रत्यक्ष पहाता आले तर नागपुरात रमन विज्ञान केंद्रात खंडग्रास चंद्रग्रहण पाहण्याची सुविधा करण्यात आली होती. छायाकल्प चंद्रग्रहण पाहण्यासाठी दुर्बिणचा वापर करण्यात आल्याचे खगोल अभ्यासक तथा स्कॉय वॉच ग्रपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. महाराष्ट्रात एकाचेवळी चंद्रग्रहणाला सुरुवात झाली. पश्चिमेकडे जाताना चंद्रग्रहणाचा आकार कमी होत गेल्याने मुंबई येथे फक्त १३ टक्के चंद्रग्रहण दिसले. अरुणाचल प्रदेशात सर्वात जास्त ९८ टक्के चंद्रग्रहण दिसला. कलकत्ता पासून तर भूजपर्यंत पश्चिमेकडे चंद्रग्रहण लहान होत होता. वातावरण निरभ्र असल्याने चंद्रग्रहणाचा लाभ नागरिकांना विद्यार्थ्यांना घेता आला.

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ३.५० वाजता चंद्रग्रहणाला सुरुवात होऊन ७.०० वाजेपर्यंत खंडग्रास चंद्रग्रहण पाहता आले. त्यानंतर २० मिनिटे ७.२० पर्यंत छाया कल्प चंद्रग्रहण होते. हे चंदग्रहण प्रत्यक्ष पहाता आले नसले तर ते चंद्रग्रहण सुरू होते. या वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण असल्याने खगोलीय घटना असल्याने महाराष्ट्र व विदर्भातील खगोल प्रेमी विद्यार्थी व नागरिकांकरीता खंडग्रास चंद्रग्रहणाची पर्वणीच लाभली होती.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news