Sania Mirza And Shoaib Malik : सानिया मिर्झा-शोएब मलिकचा घटस्फोट? | पुढारी

Sania Mirza And Shoaib Malik : सानिया मिर्झा-शोएब मलिकचा घटस्फोट?

इस्लामाबाद, वृत्तसंस्था : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिक (Sania Mirza And Shoaib Malik) हे एकमेकांपासून घटस्फोट घेण्याची तयारी करत असल्याचा दावा पाकिस्तानी मीडियाने केला आहे. यामध्ये असेही म्हटले जात आहे की, शोएबने सानियाला धोका दिला असून सध्या दोघेही वेगवेगळे राहात आहेत.

हैदराबादमध्ये 12 एप्रिल 2010 रोजी सानिया व शोएब यांचा विवाह झाला होता. या दोघांना इजहान नामक मुलगा आहे. विवाहानंतर 12 वर्षांनी सानिया व शोएब (Sania Mirza And Shoaib Malik) यांचा घटस्फोट होणार असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सानियाच्या सोशल मीडियावरील पोस्टने यास आणखी हवा मिळत आहे. सानियाने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘टूटे दिल कहां जाते है…’ असे लिहिले होते.

सानियाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये स्वत:लाच प्रश्न विचारला आणि स्वत:च त्याचे उत्तर दिले आहे. दरम्यान, या दोहोंमध्ये दरी निर्माण झाल्याची शंका व्यक्त केली जात असतानाच सानियाने ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये सानियाचे मन दुखावले गेले असून ती दु:खी झाली आहे. हे दु:ख ती जाहीरही करत आहे. यामुळे या दोहोंमध्ये घटस्फोट होण्याची शक्यता बळावली आहे.

हेही वाचा

Back to top button