KYC अपडेटचा बहाणा करून वृद्धाची साडेतीन लाखांची फसवणूक

KYC अपडेटचा बहाणा करून वृद्धाची साडेतीन लाखांची फसवणूक
Published on
Updated on

यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : शहरातील संकटमोचन परिसरातील एका वृद्धाला एका भामट्याने गंडा घातला. केवायसीचा (KYC) बहाणा करून त्यांच्या बँक खात्यातील ३ लाख ४७ हजार ८०७ रुपये या भामट्याने परस्पर काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

रमेश भास्कर देशमुख (वय-६६) असे फसवणूक झालेल्या वृद्धाचे नाव आहे. देशमुख यांना त्यांच्या मोबाईलवर १५ सप्टेंबरला सकाळी १०:३० वाजता एका अनोळखी व्यक्तीचा फोन कॉल आला. बीएसएनएल ऑफिसमधून बोलतोय असे सांगून मोबाईल सिमची केवायसी (KYC) अपडेट करणे आवश्यक असल्याची बतावणी केली.

अन्यथा तुमचे सिम लॉक होईल. केवायसी अपडेट करण्यासाठी त्या व्यक्तीने ऑटोमॅटिकली फॉरवर्ड एसएमएस मेसेज तसेच टीम युअर आयडी असे दोन अॅपलिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. अॅपलिकेशन डाऊनलोड केल्यानंतर २० रुपयांचा रिचार्ज ऑनलाईन करायला लावला. मात्र कस्टमर आयडी जनरेट होत नसल्याची देशमुख यांनी तक्रार केली. त्या ठगाने पुन्हा रिचार्ज करायला लावला.

ओटीपी ट्रांजेक्शन पासवर्ड मेसेजच्या सर्चमध्ये टाकायला सांगितला. त्यानंतर तुम्हाला कस्टमर आयडी दिसेल, असेही सांगितले. सकाळी १०:३० ते ११:३० असा तब्बल १ तास फोनवर देशमुख यांच्याशी या ठगाचे संभाषण सुरू होते. त्याने सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया करूनही कस्टमर आयडी आलाच नाही.

यामुळे देशमुख यांना संशय आला. बँक खात्याची पडताळणी केली तेव्हा त्यांच्या खात्यामध्ये असलेले ३ लाख ४७ हजार ८०७ रुपये परस्पर काढून घेतल्याचे निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर देशमुख यांना जबर धक्का बसला. त्यांनी थेट अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news