कोल्हापुरात येण्याआधीच किरीट सोमय्या यांना होणार अटक?

हसन मुश्रीफ यांचे घोटाळे दाबण्यासाठी मला अटक करण्याचे आदेश : किरीट सोमय्या
हसन मुश्रीफ यांचे घोटाळे दाबण्यासाठी मला अटक करण्याचे आदेश : किरीट सोमय्या
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या निवास्थानाच्या परिसरात पोलिस फौजफाटा तैनात केल्याचे समोर आले आहे. तसेच कोल्हापुरात न येण्याचे सोमय्या यांना आदेश देण्यात आला आहे. ही नोटीस कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्या नावे असल्याची सूत्रांकडून समजते आहे.

दरम्यान, नोटीस घेऊन पोलिस अटक करण्यासाठी सोमय्या यांच्या घरी हजर झाल्याचे समजते आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना सोमय्यांनी घणाघाती टीका केली आहे.

सोमय्या म्हणाले की, 'घोटाळेबाज सरकराने राज्याची वाट लावली आहे. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी मला अटक करण्याचा आदेश देण्यात आला आहे. माझं कितीही तोंड दाबले तरी मी मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढणार आहे, असे संतप्त मत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान,माजी खा. किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून दिली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांना 'का अटक करणार'? असा सवाल उपस्थित केला आहे. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकार लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news