अमरावती : क्रिकेट सट्टा प्रकरणातील मुख्य बुकी कॉस्कोला अटक; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

अमरावती : क्रिकेट सट्टा प्रकरणातील मुख्य बुकी कॉस्कोला अटक; गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : भारत आणि न्यूझीलंड मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यावर मोबाईलद्वारे क्रिकेट सट्टा बुक करणाऱ्या सचिन वासुदेव येरोणे (वय ३७, रा. सातुर्णा) या आरोपीला पोलीस आयुक्तांच्या पथकाने 25 नोव्हेंबर रोजी रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर क्रिकेट सट्टा प्रकरणातील मुख्य बुकी अनिल ऊर्फ कास्को मेटकर याच्यासह आणखी एका साथीदारांचा शोध ते घेत होते. मुख्य बुकी अनिल ऊर्फ कास्को मेटकर याला अटक करण्यात अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाला यश असून मेटकर याला आज (दि.८) पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, क्रिकेट सट्टा बुक करणाऱ्या सचिन येरोणे याला ताब्यात घेत पोलिसांकडून दोन मोबाईलसह क्रिकेट सट्टा संबंधित साहित्य जप्त करण्यात आले होते. यातील मुख्य आरोपी कॉस्को उर्फ अनिल मेटकर आणि सोनू उदापुरे उर्फ उदापूरकर यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. मेटकर हा मुंबईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अमरावती शहर गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली. त्याला पुढील तपासकामी अमरावती येथे आणण्यात येत आहे.

ही कारवाई. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक राजकिरण येवले, पोलिस हवालदार गजानन ढेवले, चेतन कराळे, प्रशांत नेवारे यांनी केली.

         हेही वाचलंत का ?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news