

जळगाव: पुढारी वृत्तसेवा
रावेर पंचायत समितीत बहुचर्चित वैयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणी रावेर पोलिसांनी पुन्हा अटकसत्र राबविले आहे. यात वेगवेगळ्या गावांमधून पोलीसांनी एकूण ९ आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आत्तापर्यंत ३३ आरोपी अटक करण्यात आले आहेत. रावेर पंचायत समितीत बहुचर्चित शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचारप्रकरणी पोलिसांनी अटकसत्र राबवित वेगवेगळ्या गावांमधून एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये गोकुळ करुले (अटवाडे), ललित सोनार (निंभोरा), बाळु कोळी (रणगाव), विश्वनाथ कोळी (रायपुर), प्रवीण इंगळे (रावेर), भूषण पाटील (धामोडी), गोकुळ रुळे (मस्कावद सिम), युवराज बोदडे (निंभोरा), रविंद्र पाटील (मोरगाव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर यासंदर्भात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.