

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : गोंदिया, आमगाव व गोरेगाव या तीन तालुक्यासाठी जीवनदायिनी समजल्या जाणार्या पांगोली नदीचे पाणी प्रदूषणामुळे विषारी झाले आहे. पाण्याचे रंग हिरवा व पिवळा झाला असून दुर्गंधी सुटली आहे. जनावरांनाही पिण्यासाठी ते अयोग्य ठरले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात तीनही तालुक्यातील 40 गावातील जलस्त्रोतांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.