गोंदिया : गँगवारच्या रुपात केली हत्या
गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : वसंनगरात (गोदींया) रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या बुधवारी रात्री ११ च्या सुमारास गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राजा सांडेकर युवकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. तसेच आशिष ठाकूर गंभीर जखमी असून नागपूरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
सावराटोली निवासी राजा सांडेकर याच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत. राजा सांडेकर आणि आशिष ठाकूर हे दोघे मोटारसायकलने वसंतनगरातील त्यांचा मित्र नरेश नागपूरे याच्याकडे जात असतानाच सहा-सात जणांनी मोटारसायकलला घेरुन सांडेकरला दगड वीटा घेवून मारहाण सुरू केली.
दरम्यान, यात सांडेकरचा मृत्यू झाला. तर ठाकूरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रात्रीलाच त्यास नागपूरला हलवण्यात आले. नरेश नागपूरे व राजा सांडेकर गुन्हेगारी स्वरुपातील आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, याप्रकरणातील सर्व आरोपी अद्यापही फरार असून रामनगर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.अशी माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचलं का

