गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : सुरजागड पहाडावरुन लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याने मोटारसायकलवरील एकाच कुटुंबातील तिघे जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि.२५) दुपारी ४ च्या सुमारास चामोर्शी येथील नवीन तहसील कार्यालयाजवळच्या वळणावर घडली. Gadchiroli Accident News
भावना नरेंद्र जंधलवार (वय ४५), रुद्र गणेश जंधलवार (वय ४) व प्रियंका गणेश जंधलवार (वय २७) अशी मृतांची नावे आहेत. तर नरेंद्र जंधलवार ( वय ५३) हे गंभीर जखमी झाले. प्रियंका व रुद्र हे मायलेक असून भावना ही नरेंद्र जंधलवार यांची पत्नी आहे. भावना आणि नरेंद्र भावना हे प्रियंकाचे चुलत सासू-सासरे आहेत. सर्वजण चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील रहिवासी आहेत. Gadchiroli Accident News
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रियंकाचे पती गणेश जंधलवार यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे विधवांना मिळणाऱ्या शासकीय सवलतीचा लाभ घेण्याविषयीचा अर्ज भरण्यासाठी हे कुटुंब आज तहसील कार्यालयात आले होते. काम आटोपून मोटारसायकलने गावाकडे परत जात असताना लोहखनिज घेऊन येणाऱ्या सीजी ०८- एयू ९०४५ क्रमांकाच्या ट्रकने त्यांना जबर धडक दिली. ट्रकने मोटारसायकलला दहा ते पंधरा फूट फरफटत नेले. यात भावना व रुद्र यांचा जागीच ठार, तर प्रियंका हिचा गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. नरेंद्र गंधलवार यांची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरुन पोबारा केला. अपघात भयावह असल्याने पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी जेसीबीच्या साह्याने मृतदेह बाहेर काढले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा