गडचिरोली : नक्षलवाद्यांचा डाव उधळला; पुरुन ठेवलेली स्फोटके नष्ट | पुढारी

गडचिरोली : नक्षलवाद्यांचा डाव उधळला; पुरुन ठेवलेली स्फोटके नष्ट

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने नक्षलवाद्यांनी स्फोटके पुरुन ठेवली होती. कोरची तालुक्यातील कोटगूल  गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील पहाडाच्या पायथ्याशी ही २ किलो स्फोटके पुरुन ठेवली होती.  ही स्फोटके आज (दि.१९) शोधून काढत पोलिसांनी ती शिताफीने नष्ट केली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

कोटगूल पोलिस ठाण्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील पहाडाच्या पायथ्याशी नक्षल्यांनी स्फोटके पुरुन ठेवली आहेत, अशी माहिती आज कोटगूलचे पोलिस निरीक्षक धनंजय कुळकर्णी यांना मिळाली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत स्फोटके शोधून काढली. त्यानंतर ही स्फोटके नष्ट करण्यात आली. जमिनीत दीड ते दोन फूट खोल एका कूकरमध्ये ही स्फोटके पेरण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button