Shiv Jayanti : कौठाळीच्या नदीपात्रात प्रभु श्रीरामाच्या अवतारात साकारली शिवरायांची प्रतिकृती | पुढारी

Shiv Jayanti : कौठाळीच्या नदीपात्रात प्रभु श्रीरामाच्या अवतारात साकारली शिवरायांची प्रतिकृती

सोमा लोहार

कौठाळी : कौठाळी (ता. पंढरपूर) येथील भीमा नदी पात्रात शिवजयंती निमित्त प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अवतरातील क्षत्रिय शिवरायांची प्रतिकृती साकारली आहे. कौठाळी येथील कलाकार प्रवीण नगरे व सुरज नगरे या बंधुंनी ही प्रतिकृती साकारली. चांदणी चौक ते भिमा नदी पात्राकडे जाणाऱ्या घाट मार्गावर दोन्ही बाजुला मंडप. आकर्षक लाईटिंग करून रांगोळीच्या पायघड्या घातल्या आहेत. Shiv Jayanti

लोखंडी बॅरलच्या आधारे प्रभू श्रीरामांच्या अवतरातील छत्रपती शिवाजी महाराज यांची २५ फुटी मूर्ती उभारली आहे. यासाठी लोखंडी पाईप, पत्रे, बॅरल, थर्माकोल २५ फूट उंचीचा भगवा ध्वज यांचा वापर करण्यात आला आहे. शिवरायाच्या हातामध्ये राजदंड घेऊन ही प्रतिकृती विराजमान झाली आहे. Shiv Jayanti

त्रेता युगामध्ये प्रभू श्रीराम यांनी केलेला पराक्रम व अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू धर्मावर होत असलेल्या अन्यायाविरोधात दिलेला लढा या दोन्ही योद्ध्यांचे पराक्रम हिंदू राष्ट्रासाठी अनमोल आहेत. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रभू श्रीरामचंद्र अवतरातील प्रतिकृती उभारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनासाठी भोई समाजाच्या वतीने मोफत होडीची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शन घेण्यासाठी तालुक्यातील नेते मंडळीसह शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.

हेही वाचा 

Back to top button