भंडारा : गोशाळेतील जनावर विक्री प्रकरणी आणखी आठ जणांना अटक

भंडारा : गोशाळेतील जनावर विक्री प्रकरणी आणखी आठ जणांना अटक
Published on
Updated on

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : गोशाळेत दाखल झालेल्या जनावरांची पशुवैद्यकांच्या मदतीने परस्पर विक्री करण्यात येत होती. या प्रकरणी पोलिसांनी आणखी आठ जणांना शुक्रवारी अटक केली. या प्रकरणातील आरोपींची संख्या आता १३ झाली आहे.

शिवशंकर भास्कर मेश्राम (४०), नानाजी मोतीराम पाटील (५१), विलास देवनाथ तिघरे (४०) सर्व रा. सिरसाळा, विपीन शरद तलमले (३७) रा. नेताजी वॉर्ड पवनी, खुशाल दिलीप मुंडले (३०) रा. बेटाळा ता. पवनी, महेश दौलतराम मसराम (२७) रा. ताडेश्वर वॉर्ड पवनी, मिलींद रामदास बोरकर (४०) रा. नेताजी वॉर्ड पवनी, दत्तू शंकर मुनरत्तीवार (४६) रा. भाईतलाव वॉर्ड पवनी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पवनी तालुक्यातील सिरसाळा येथील गोशाळेत दाखल जनावरांची परस्पर विक्री करण्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष विसर्जन चवसरे, डॉ. हेमंत गभणे, अंकुश मेंढूले, समीर शेख उर्फ जलील खान आणि मुनाफ शेख आलम शेख यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.

शुक्रवारी पोलिसांनी आणखी आठ जणांना अटक केली. त्यामुळे आता आरोपींची संख्या १३ झाली आहे. या प्रकरणात चार पशुवैद्यकांसह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणखी आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news