नागपूर : दीक्षाभूमीपासून ऐतिहासिक धम्म पदयात्रेला प्रारंभ; १५ जुलैला लडाख येथे समारोप

नागपूर : दीक्षाभूमीपासून ऐतिहासिक धम्म पदयात्रेला प्रारंभ; १५ जुलैला लडाख येथे समारोप

Published on

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आणि बुद्धांचे धम्मचक्र गतिमान करण्यासाठी दीक्षाभूमी ते लेह लडाखपर्यंत धम्म पदयात्रा काढण्यात येणार आहे. थायलंड येथील मुख्य भन्ते पहरा थेपारीया तीसुथी व त्यांच्या इतर १० भंतेंच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र दीक्षाभूमीवर या पदयात्रेचा आज (दि.६) प्रारंभ करण्यात आला. तत्पूर्वी  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांना अभिवादन करण्यात आले. दीक्षाभूमीवरून ही धम्म पदयात्रा कन्हानलगतच्या सिहोरा येथे जाणार असून तेथे श्रामणेरांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

याप्रसंगी गगन मलिक फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष गगन मलिक, थायलंडचे भंते कंतराथाना, भंते रुपेश, भंते प्राखंती बरोम, भंते थीयाछयो, भंते प्रार्थनासून, चीतिको भिकू, प्रहरा महाछाटवना, अनुसूचित जाती राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे, राजेश लाडे, पी. एस. खोब्रागडे, ममता गेडाम, गगन मलिक फाउंडेशनचे राष्ट्रीय समन्वयक नितीन गजभिये आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी उरुवेला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात १०० लोकांना थायलंड पद्धतीने श्रामणेर दीक्षा देण्यात आली. थायलंड येथील मुख्य भन्ते पहरा थेपारीया तीसुथी यांनी सर्वांना श्रामणेर दीक्षा, पंचशील आणि २२ प्रतिज्ञा दिल्या. यावेळी बोलताना भन्ते पहरा थेपारीयातीसुथी म्हणाले, जगात फार अशांतता आहे, आपापसातील वैर वाढले आहे, द्वेष, मत्सर वाढला आहे. जातीयवाद वाढला आहे. यातून मुक्ती जर हवी असेल तर बुद्धाचा मार्ग स्वीकारावा लागेल.

गगन मलिक फाऊंडेशन आणि आश्रय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र दीक्षाभूमी ते लेह लद्दाखपर्यंत धम्म पदयात्रा दीक्षाभूमी येथून आज सुरुवात झाली. 6 ते 8 मे असे दोन दिवस सिहोरा कन्हान येथे श्रामनेर प्रशिक्षण झाल्यानंतर जवळपास 100 श्रमनेरांना राजगीर येथे नेण्यात येईल. तेथून वेणुवन आणि वेणुवंन ते बुद्धगया, बुद्धगया ते धर्मशाला आणि धर्मशाला येथून धम्म पदयात्रेला सुरुवात होईल. या धम्म पदयात्रेत भारतातील 100 तर थायलंडचे 100 भंते सहभागी होतील. ही धम्म पदयात्रा 15 जुलैरोजी लेह लडाख येथे पोहोचेल व तेथे समारोप होईल.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news