नागपूरमधील विकासकामांचा नितीन गडकरींनी घेतला आढावा

नागपूरमधील विकासकामांचा नितीन गडकरींनी घेतला आढावा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरमधील विविध विकासकामांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज ( दि.५) नागपूरमध्ये आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत रेशीमबाग मैदानाचा विकास, स्वदेश दर्शन योजनेंतर्गत वाकी, धापेवाडा, पारडसिंगा व गिरड तीर्थक्षेत्रांचा विकास, परमात्मा एक सेवक प्रकल्प, वर्धमान नगर येथील आयनॉक्स, बिग बझार प्रकल्पाबाबत नियोजन, पश्चिम आणि उत्तर नागपूरातील रस्त्यांची कामे, पुनापूर – भरतवाडा येथील वीट भट्टी प्रकल्प, नागपूर सुधार प्रन्यास नवीन इमारत तसेच नासुप्रच्या व्यावसायिक कॉम्प्लेक्स अशा अनेक प्रकल्पांच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला.

दरम्यान, हलबा समाजाच्या कर्मचाऱ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेता त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याबाबत गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. बैठकीला आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. मोहन मते, आ. विकास कुंभारे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

                      हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news