नागपूर : प्राईड हॉटेलमध्ये छापेमारी; दोन रशियन मुलींची तिघींची सुटका तर दोघांना अटक | पुढारी

नागपूर : प्राईड हॉटेलमध्ये छापेमारी; दोन रशियन मुलींची तिघींची सुटका तर दोघांना अटक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील वर्धा रोड येथील प्राईड हॉटेलमध्ये सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. मंगळवारी सकाळी नागपूर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने (एसएसबी) याप्रकरणाचा छडा लावत द प्राईड हॉटेलमध्ये छापेमारी केली. यादरम्यान दोन रशियन मुलींसह तिघींची सुटका करण्यात आली असून बंदी उर्फ बिलाल अहमद (वय ३७, रा. शंभू नगर, प्लॉट ७, मानकापूर), राजकुमार गलवार (वय ४०, रा. कामठी रोड, विम्स हॉस्पीटल, सदर ) या दलालांना अटक करण्यात आली.

यावेळी आरोपीकडून ६ मोबाईल, नगदी रक्कम, एक चारचाकी वाहनासह एकूण 10 लाख 51 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त अश्वती दोर्जे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मुम्मका सुदर्शन, सहा पोलीस आयुक्त मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे, सपोनि माधुरी नेरकर, अनिल अंबाडे, समीर शेख, अश्विन मागे, संदीप चांगोले, सुभाष चौधरी, मपोहवा रीना यांनी केली.

दरम्यान, हॉटेल प्राईड व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार आम्ही ज्या व्यक्तीच्या तपासासाठी पोलीस यंत्रणा आली त्यांना सहकार्य केले. ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून सदर खोल्यांचे आरक्षण झाले होते. संबंधित आवश्यक कागदपत्रे आम्ही दाखविली आहेत.

दरम्यान, नागपुरात देहव्यापाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याठिकाणी देहव्यापारासाठी अल्पवयीन मुलींची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असून त्याचे केंद्रबिंदू नागपूर असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गुन्हे अन्वेषण विभागानेही यास दुजोरा दिला आहे.

अधिक वाचा : 

Back to top button