

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वरोरा येथे धानोरकर निवासस्थानी स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रतिमेला पुष्पवाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी यावेळी दिवंगत खासदार यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांची सांत्वन पार भेट घेऊन संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चंद्रपूरचे तरुण खासदार आणि माझे मित्र बाळू धानोरकर यांचे नुकतेच अकाली निधन झाले. वरोरा येथील त्यांच्या निवासस्थानी सोमवारी (दि.५) दुपारी जाऊन स्वर्गीय बाळूभाऊंना आदरांजली वाहिली. त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा वहिनी आणि कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो, अशी प्रार्थना केली. यावेळी त्यांच्यासोबत चिमूरचे आमदार बंटी भांगडिया, भंडाराचे आमदार परिणय फुके आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.