Amitabh Bachchan: सुलोचना यांच्या निधनानंतर भावूक झाले बिग बी | पुढारी

Amitabh Bachchan: सुलोचना यांच्या निधनानंतर भावूक झाले बिग बी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी सुलोचना लाटकर यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. ३ जून रोजी सुलोचना यांचे निधन झाले. त्या ९४ वर्षाच्या होत्या. (Amitabh Bachchan) अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले की, दिग्गज स्टारने अनेक चित्रपटामध्ये त्यांच्या आईची भूमिका साकारली होती. (Amitabh Bachchan)

अमिताभ यांनी लिहिलं, ‘आम्ही सिनेमा जगतातील एक आणि महान अभिनेत्री- सुलोचना जी यांना गमावलं. त्यांनी माझ्या अनेक चित्रपटांमद्ये प्रमेळ, काळजी करणाऱ्या आईची भूमिका साकारली होती. त्या दीर्घकाळ आजारी होत्या आणि आम्हाला सोडून स्वर्गात गेल्या आहेत.’

अभिनेते बच्चन म्हणाले की, मी त्यांच्या परिवारासोबत त्यांच्या तब्येतीवर नजर ठेवून होतो. अखेर ही वाईट बातमी समोर आली. आम्ही या दु:खाच्या प्रसंगी केवळ प्रार्थना करू शकतो.’

अमिताभ आणि सुलोचना यांनी ‘रेशमा और शेरा’, ‘याराना’, ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘रोटी कपडा और मकान’ यासारख्या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे.

याशिवाय अन्य कलाकारांनीही त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

Back to top button