rana couple
rana couple

NCP vs Rana Couple : …अन् राष्ट्रवादी-राणा दाम्पत्यामधील ‘हाय होल्टेज ड्रामा’मधील निघाली हवा

Published on

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : हनुमान चालीसा पठणासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी राणा दाम्पत्यासह राष्ट्रवादी काँग्रेसलाही (ncp vs rana couple) वेगवेगळ्या वेळी अटींसह हनुमान चालीसा पठणाची परवानगी दिली. या .िनिर्णयामुळे या हाय होल्टेज ड्रामातील  हवाच निघून गेली. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, पदाधिकारी प्रशांत पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठरलेल्या वेळी हनुमान चालीसा पठण केले. त्यानंतर आरती करून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निघून गेल्यावर काही वेळाने राणा दाम्पत्याचे हनुमान मंदिरात आगमन झाले.

(ncp vs rana couple) राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या वेळी तटस्थ असणारे मंदिर समितीचे पदाधिकारी राणा दाम्पत्याच्या वेळी मात्र उत्साहात होते. पदाधिकाऱ्यांनी राणा दाम्पत्य येण्यापूर्वी हनुमान चालीसा, हनुमान स्तोत्राचे पठण केले. राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा पठण करून आरती केली. त्यानंतर ते अमरावतीला रवाना झाले.

राणा दाम्पत्याला विमानतळ ते हनुमान मंदिरापर्यत रॅलीची परवानगी पोलीस आयुक्तांनी शुक्रवारीच नाकारली होती. शनिवारी विमानतळावर आगमन होताच राणा दाम्पत्याचे ढोलताशाच्या दणदणाटात स्वागत झाले. विमानतळावरील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून राणा दाम्पत्य राम नगरातील हनुमान मंदिरात आले. तिथे ठरल्या प्रमाणे हनुमान चालीसा पठण केल्यानंतर ते अमरावतीला रवाना झाले.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news