मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी विदर्भात; माजी आमदारांचा होणार पक्षप्रवेश

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आगामी हिवाळी अधिवेशनाच्या काळात शिवसेनेत (शिंदे गट) विदर्भातील माजी आमदार आणि शिवसेना ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी प्रवेश करणार आहेत. शनिवारी (दि.१२) गोसिखुर्द प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर व पूर्व विदर्भात येत आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून शिंदे यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. तेव्हापासून शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ४० आमदारांच्या विरोधात राज्यभर फिरून पक्ष बळकट करत असताना शिंदे गटाकडून त्यांना सातत्याने हादरे देण्यात यश येत आहे.

शिवसेनेचे ४० आमदार आणि अनेक जिल्हाप्रमुख आपल्या बाजूने वळवल्यानंतर शिंदे सेनेने आता पूर्व विदर्भात आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला मोठे खिंडार पाडले आहे. बाळासाहेबांची शिवसेना गटाचे विदर्भातील नेते किरण पांडव यांनी पूर्व विदर्भातील चंद्रपूर, नागपूर,ग्रामीण, रामटेक, भंडारा, गडचिरोली, नागपूर शहर या जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने वळविले आहे. हे सर्व पदाधिकारी नागपुरातीलच मेळाव्यात शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश घेणार आहेत.

दरम्यान, चार ते पाच काँग्रेसचे माजी आमदार लवकरच शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. अनेकजण संपर्कात असलेत तरी तूर्तास कुणाचीही नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला. २०१९ नंतर येत्या १९ डिसेंबरपासून विदर्भात अधिवेशन होत आहे. कडाक्याच्या थंडीत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news