Sudhir Mungantiwar | होय, आमचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात : सुधीर मुनगंटीवार

Chandrapur Municipal Politics | चंद्रपूर महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत
BJP vs Congress Chandrapur
विजय वडेट्टीवार-सुधीर मुनगंटीवारPudhari
Published on
Updated on

BJP vs Congress Chandrapur

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर भाजप व काँग्रेसमध्ये आरोप–प्रत्यारोपांना वेग आला असून, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या दाव्यावर भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मिश्किल पण आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. “भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत,” या वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर मुनगंटीवारांनी थेट पलटवार करत, “होय, आमचे नगरसेवक त्यांच्या नगरसेवकांच्या संपर्कात आहेत,” असे सांगत राजकीय फिरकी घेतली आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. या दाव्यावर प्रत्युत्तर देताना भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी, वडेट्टीवारांचा दावा योग्य असल्याचे सांगत राजकीय टोला लगावला.

BJP vs Congress Chandrapur
Chandrapur Municipal corporation news: चंद्रपूरला काँग्रेसचाच महापौर, प्रभारी कुणाल चौधरींचा दावा

मुनगंटीवार म्हणाले, “काँग्रेसचा दावा योग्य आहे. आमचे नगरसेवक त्यांच्या नगरसेवकांच्या संपर्कात आहेत. भाजपचा महापौर बनवण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांना आमचे नगरसेवक आग्रह करीत आहेत.” विकासाच्या मुद्द्यावर भाजपची भूमिका स्पष्ट असल्याचे सांगत त्यांनी पुढे म्हटले की, “विकास करायचा असेल, निधी आणायचा असेल, तर भाजपसोबतच गेले पाहिजे, अशी काँग्रेस नगरसेवकांचीही इच्छा आहे.”

काँग्रेसचे नगरसेवक सध्या अज्ञातस्थळी ‘बंदिस्त’ असल्यामुळे प्रत्यक्ष येऊ शकत नसल्याचा दावा करत मुनगंटीवार म्हणाले, “मात्र योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, अशी भूमिका काँग्रेस नगरसेवकांनी आमच्याकडे व्यक्त केली आहे. सध्या हा संपर्क दूरध्वनीवरून सुरू आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.

BJP vs Congress Chandrapur
Chandrapur Accident | नांदगाव येथे पादचाऱ्याला धडक देऊन पिकअप उलटली: २ ठार, १३ जण जखमी

दरम्यान, विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेसवर टीका करताना मुनगंटीवार म्हणाले की, “बहुमत कुणाकडे आहे, याबाबत जनतेमध्ये संभ्रम असू शकतो. पण विकास केवळ भाजपच करू शकते, यावर लोकांचे एकमत आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. महानगरपालिका स्वबळावर विकास करू शकत नाही. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून निधी आणावा लागतो.” काँग्रेस सत्तेतील गावांची स्थिती पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महापौरपदाच्या रोस्टरबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “महापौरपदाचे रोस्टर जाहीर झाल्यावर स्थिती आणखी स्पष्ट होईल. सध्या सर्वांनाच महापौर बनायची इच्छा असल्याने सर्वच मेहनत घेत आहेत.”

BJP vs Congress Chandrapur
Chandrapur Congress | शेतकरी व जनसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी जिवतीत काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा

महापौरपदावर आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट करताना ते म्हणाले, “महापौर झाला तर तो भाजपचाच होईल, अन्यथा आम्ही विरोधात बसू. काँग्रेसचा महापौर झाला, तर शहराचा विकास होईल का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

चंद्रपूरमध्ये भाजपची सत्ता यावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत मुनगंटीवार म्हणाले, “बोलण्याची जबाबदारी माझ्यावर दिली असल्याने मी या विषयावर बोलतो. पुन्हा एकदा सांगतो, भाजपचा महापौर बनवण्यासाठी आमचे नगरसेवक काँग्रेस नगरसेवकांच्या संपर्कात आहेत,” असे म्हणत त्यांनी वडेट्टीवारांवर पुन्हा टोला लगावला.

BJP vs Congress Chandrapur
Chandrapur Crime | मुल शहरातील चोरीचा छडा: किराणा साहित्य, वाहन चोरणाऱ्या तिघांना अटक; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

एकूणच चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचे राजकारण दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत असून, आरोप–प्रत्यारोपांच्या फैरीतून आगामी काळात आणखी घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news