

Chandrapur Jambhulghat tribal school mismanagement
चंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणून त्यांचे शैक्षणिक, आर्थिक,सामाजिक जिवनमान उंचावण्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आदिवासी आश्रम शाळा सुरू करण्यात आल्या. परंतु आदिवासी आश्रम शाळा मध्ये विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याने विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात येण्याऐवजी आरोग्याच्या समस्येंनी ग्रासत आहेत. चिमूर तालुक्यातील जांभूळघाट येथील माध्यमिक आश्रम शाळेमध्ये 267 विद्यार्थी आजार पडल्यानंतर विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक, अधिक्षकाविरोधत आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन संघटनांचे प्रतिनिधी व विद्यर्थ्यांनी शाळेतील व्यवस्थेचा पाढाच वाचला. जनावरांना ठेवणाऱ्या कोंडवा्याप्रमाणे शाळेत विद्यार्थांना राहावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आदिवासी संघटनेचे अध्यक्ष भाऊजी टेकाम यांनी सांगितले, आजारी विद्यार्थ्यांना मुलानीच रात्री रुग्णालयात नेण्यात आले, परंतु शाळेतील अधीक्षक, मुख्याध्यापक यांना त्यांच्यासोबत जाण्यासाठी वेळ मिळाला नाही. विद्यार्थ्यांनावर आजारी मित्रांना उचलून नेण्याची वेळ आली. ज्याच्या भरवश्यावर विद्यार्थी या ठिकाणी निवासी आहेत त्या अधिक्षक, मुख्याध्यापकाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालक व संघटनांनी केला. जनावरांच्या कोंडवा्या प्रमाणे येथील निवासी वसतीगृहाची अवस्था आहे. निट झोपायला बेड नाही, गाद्याही नाहीत, खाली टाकण्यासाठी चटया फाटक्या आहेत, निट खायला नाही, नीट पाणी पाणी प्यायला नाही, एक नव्हे तर अनेक सुविधांनी आदिवसी आश्रम शाळा जर्जर झाली आहे. परंतु हाकेच्या अंतरावर असलेल आदिवासी प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक, अधिक्षक यांनीही शाळेती वसतीगृहातील व्यवस्थेकडे कानाडोळा केला ओह. असा आरोप त्यांनी केला. आठवडाभरापूर्वी शाळेत 538 पैकी 267 विद्यार्थी आजारी पडले ही सर्वात मोठी घटना जांभूळघाट आदिवासी आश्रम शाळेत घडली.
त्यानंतर १६ ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री व आदिवासी विकास मंत्री श्री अशोक उईके हे चिमुरात एका कार्यक्रमासाठी आले. त्यांना शाळेतील या प्रकाराबाबत आदिवासी संघटनांनी निवेदन देवून अवगत करण्यात आले. मात्र, ते आदिवासी विभागाचेच मंत्री असूनही त्यांनी शाळेला भेट देण्याचे टाळले. पालकमंत्री महोदय स्वतः आदिवासी विभागाचे मंत्री असूनही या प्रकाराकडे लक्ष देत नसतील तर आदिवासी समाजाचा प्रश्न कोण सोडवणार?" त्यांचा विकास कसा होणार? असा गंभीर सवाल आदिवासी संघटनांनी पत्रकार परिषदेमध्ये पालकंत्री महोदयांना केला आहे. त्यांचेसोबतच या भागाचे नेतृत्व करणारे आमदारांनीही विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या या घटनेची साधी दखल घेतली नाही, विचारपूस केली नाही, भेट देता आले नाही त्यामुळे त्यांच्यावरही यावेळी टीकेची झोड उठविण्यात आली.
विद्यार्थ्यांनी सांगत आहेत कि, शाळेतील अधीक्षक जातीभेद करतात, विद्यार्थ्यांशी उध्दटपणे बोलतात, आणि अपमानास्पद वागणूक देतात. एका विद्यार्थिनीला चक्कर येऊन पडल्यावरदेखील तिच्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून अनेक विद्यार्थी शाळेत परत यायला घाबरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सदर शाळेत तब्बल ५३८ विद्यार्थी असून फक्त ९ शिक्षक आहेत. प्रत्येक वर्गाच्या दोन-दोन तुकड्या असूनही शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने शिक्षणाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर प्रभावित होत असल्याचे त्यांनी यावेळी लक्षात आणून दिले. मुलांच्या आरोग्याने चिंतीत होऊन पालकांनी सर्वच मुलांना आपल्या घरी घेऊन गेले आहेत. एकही विद्यार्थी शाळेत,वसतीगृहात नाही. त्यामुळे येथील शिक्षण व्यवस्था पूर्णत: कोलमडली असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी संघटनांनी दोषींवर कार्यवाही न झाल्यास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्यायंना अधिकारी व अधिक्षकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास विद्यार्थी शाळेत उपस्थित राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला आदिवासी संघटनांचे पदाधिकारी भाऊजी टेकाम, अध्यक्ष, पहांदीपारी कृपाल लिंगो आदिवासी संघर्ष समिती, राजकुमार मसराम, जिल्हाध्यक्ष, गोंडवाना संग्राम परिषद, सिमा मसराम, अध्यक्ष, आदिवासी संघर्ष समिती,शेवंता कोवे, सामाजिक कार्यकर्ता,चंद्रशेखर मसराम, अध्यक्ष, संघर्ष समिती, प्रल्हाद उईके, विधानसभा अध्यक्ष, जनसेवा गोंडवाना पार्टी, रामराव नन्नावरे, जिल्हा प्रभारी, बहुजन समाज पार्टी,लक्ष्मण मसराम, सुधाकर मसराम, विजय मसराम, प्रथम कोवे, चंद्रकांत गेडाम, विद्यार्थी आदित्य ठाकरे, पवन रायसिडाम, मयंक सोनवाने, साहील श्रीरामे, नयन श्रीरामे, सुमित नन्नावरे, सम्यक ढोक आदींची उपस्थती होती.
पत्रकार परिषदेमध्ये विद्यार्थी आदित्य ठाकरे, माढेळी म्हणाला : "राहण्याची सुविधा योग्य नाही. झोपण्यासाठी गाद्या देत नाहीत. अधीक्षक जातीभेद करतात, मारहाण करतात. एकदा आमच्या समोरच एका मुलीला चक्कर येऊन पडली, तरी त्यांनी काहीच लक्ष दिले नाही. आम्हीच 30-40 मुलांना उचलून दवाखान्यात नेलं, पण एकाही शिक्षकाने येऊन विचारपूस केली नाही. त्यांच्यामध्ये माणुसकी उरली नसल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थी पवन रायसिडाम, कोटगाव म्हणाला : अधीक्षक आमच्यावर खोटे आरोप करतात. ‘तुम्ही लाईट फोडले, पंखे फोडले’ असे म्हणतात. आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यामुळे शाळेतील वातावरण खूपच खराब झाले आहे.
काही विद्यार्थ्यांचे म्हणणे की, "नऊ तारखेला सकाळचे उरलेले जेवण सायंकाळी दिले. दाळभाजीमध्ये पाणी टाकून जेवण दिले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 तारखेला 30 विद्यार्थी आजारी पडले. त्यांनतर मुलांची संख्या वाढत गेली तरीही याकडे अधिक्षक, मुख्याध्यापकांनी दुर्लक्षच केले.
पिंपळगावचे पालक चंद्रशेखर मसराम म्हणाले : "माझी मुलगी ९ वीत शिकते. ती आजारी पडली असून आता शाळेत यायला घाबरत आहे. निवासी शाळेत पिण्याचे पाणी, जेवण, लाईट, पंखे व निवास सुविधा अजिबात योग्य नाहीत. सरकारने या मुलांकडे लक्ष दिले पाहिजे.