Chandrapur News | मातृत्वाला नसते सीमा! पळसगावात कुत्री - कालवडीत जुळले आई-लेकराचे नाते

गमावलेल्या लेकरानंतर मिळालं नवं बाळ, मातृत्वाच्या अनोख्या नात्याने गावकरी भारावले
Dog and Buffalo Calf Bond
Dog and Buffalo Calf BondPudhari
Published on
Updated on

Dog and Buffalo Calf Bond

राजू येरणे

चंद्रपूर: निसर्गाच्या अद्भुत लीला कधी कशा उलगडतील, याचा नेम नाही. पण काही प्रसंग असे असतात, जे कठोर काळजालाही पाझर फोडतात. चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील जंगलालगत वसलेल्या पळसगावात असाच एक भावनिक आणि थक्क करणारा प्रसंग घडला आहे. स्वतःची पिल्ले गमावल्यानंतर एका माऊलीच्या मातृत्वाने वेगळाच ध्यास घेतला… आणि ही माऊली माणूस नव्हे, तर एक कुत्री आहे.

चिमूर तालुक्यातील पळसगाव (Palasgaon) हे गाव ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वसलेले असून घनदाट जंगलाच्या सान्निध्यातील ग्रामीण जीवनशैलीसाठी ओळखले जाते. येथील घनश्याम बनसोड हे गावातील रहिवासी असून त्यांच्या कुटुंबाकडे म्हैस, गाय आणि कुत्री अशी पाळीव जनावरे आहेत. जंगलालगतचे वातावरण, शेती, जनावरांची काळजी आणि साधे ग्रामीण जीवन हे बनसोड कुटुंबाचे दैनंदिन जगणे.

Dog and Buffalo Calf Bond
Chandrapur News | चिमूर नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन : मुख्याधिकाऱ्यावर शिवीगाळ, धमक्या, मानसिक छळाचा गंभीर आरोप

काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरातील पाळीव कुत्रीने पाच पिल्लांना जन्म दिला. मात्र, दुर्दैवाने काही दिवसांतच ही सर्व पिल्ले एकापाठोपाठ एक मृत्यूमुखी पडली. या आघाताने माऊली कुत्रीच्या डोळ्यांतील मातृत्व मात्र संपले नाही… उलट, तिला दुसऱ्या लेकराचा आधार शोधू लागला. याच कालावधीत बनसोड यांच्या म्हशीने एका गोंडस कालवडीला जन्म दिला होता. घनश्याम बनसोड दिवसभर जंगलालगतच्या भागात शेती व गुरं राखण्यासाठी जात असल्यामुळे, पिल्ले गमावलेली कुत्री आणि नवजात कालवड दोघेही घरीच असायचे. याच वेदनेच्या आणि एकटेपणाच्या सामायिक क्षणी, दोघांत एक अनोखा मातृत्वबंध निर्माण झाला.

मागील ८ ते १० दिवसांपासून, ही कुत्री त्या म्हशीच्या कालवडीला स्वतःच्या पिल्लासारखे जवळ घेऊन शांतपणे दूध पाजत असल्याचे दृश्य बनसोड यांच्या घरी दररोज पाहायला मिळत आहे. कालवड जेव्हा तिचे दूध पिते, तेव्हा कुत्री ना गुरगुरते, ना विरोध करते – उलट, आपल्या लेकराला मायेने दूध पाजावे तसे ती कालवडीला पाजते.

Dog and Buffalo Calf Bond
Chandrapur Air Pollution | चंद्रपुरात ३६५ पैकी २०१ दिवस हवा आरोग्यासाठी घातक; केवळ ७८ दिवस ‘चांगल्या’ श्रेणीत

सामान्यतः कुत्री आपल्या पिल्लांचे संरक्षण करताना इतर प्राण्यांवर हल्ला करते, अशी सर्वसाधारण समज आहे. मात्र, पळसगावातील या प्रसंगाने ती समजही मोडीत काढली. मायाळूपणा फक्त माणसात नसतो, तर जनावरातही मातृत्वाचा महासागर दडलेला असतो, हे या कुत्रीने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

हा प्रसंग पाहून बनसोड कुटुंबही भावूक झाले. त्यांनीच या दुर्मिळ क्षणाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये टिपला आणि सोशल मीडियावर शेअर केला. बघता बघता हा व्हिडिओ गावातील व्हॉट्सॲप ग्रुप, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल झाला. या अनोख्या मातृत्वाची कहाणी पाहण्यासाठी आणि त्या दृश्याला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अनेक लोक आता प्रत्यक्ष बनसोड यांच्या घरी भेट देत आहेत.

Dog and Buffalo Calf Bond
Chandrapur Crime | कत्तलीसाठी नेणाऱ्या ६ बैलांची सुटका; ७.२० लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

पळसगावातील या घटनेने केवळ सोशल मीडियाच नाही, तर मानवी मनंही जिंकली आहेत. आपल्या पिल्लांच्या मृत्यूनंतरही मातृत्वाचा ध्यास न सोडणाऱ्या त्या माऊली कुत्रीने, प्रेम आणि मायेची परिभाषाच बदलून टाकली आहे. निसर्गाची ही किमया आजही सांगून जाते – आई ही आईच असते, तिचं रूप कोणतंही असो.

जनावरातलं मातृत्व माणसालाही प्रेम शिकवून जातं, आईचं काळीज कोणत्याही रूपात असू दे, ते फक्त देणं जाणतं, अशा भावनिक प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

https://www.youtube.com/watch?v=dgZLbEu2XfA

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news