Navneet Rana vs Imtiyaj Jalil : "बोगस जातीचे प्रमाणपत्र..." : जलील यांचे नवनीत राणांना आव्‍हान  | पुढारी

Navneet Rana vs Imtiyaj Jalil : "बोगस जातीचे प्रमाणपत्र..." : जलील यांचे नवनीत राणांना आव्‍हान 

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : “अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जर मला बोगस जातीचे प्रमाणपत्र काढून देण्यास मदत करत असतील तर मी त्यांच्या विरोधात लढायला तयार आहे.”, असे विधान संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज (दि.२५) चंद्रपुरामध्‍ये केले. ‘एमआयएम’च्या पक्षप्रवेश सोहळ्यानिमित्त ते चंद्रपुरात बोलत होते.

Navneet Rana vs Imtiyaj Jalil : त्यांची बुद्धिमत्ता काय?

संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील आणि अमरावतीच्या खासदार नवणीत राणा यांच्यामध्ये सध्या आराेप-प्रत्‍याराेप सूरु आहेत. इम्तियाज जलील चंद्रपुरात एका कार्यक्रमानिमित्त आले असता. माध्यमांशी बाेलताना ते म्‍हणाले, ” नवनीत राणा यांना कळायला पाहिजे की, त्या ज्या जागेवर लढत आहे. ती जागा राखीव आहे. त्या ठिकाणी इम्तियाज जलील कसे लढू शकतात? यावरून त्यांची बुद्धिमत्ता काय आहे हे दिसून येते. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जर मला बोगस जातीचे प्रमाणपत्र काढून देण्यास मदत करत असतील तर मी त्यांच्या विरोधात लढायला तयार आहे. “
हेही वाचा 

Back to top button