चंद्रपूर : मासे पकडताना सिव्हरेज प्लांटमध्ये पडला; १२ वर्षीय मुलाचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : मासे पकडताना सिव्हरेज प्लांटमध्ये पडला; १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर महानगरालगतच्या वेकोली कॉलनी दुर्गापूर येथील बंद सिव्हरेज प्लांटमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका बारा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.७) सायंकाळी घडली. प्रेम शंकर वाघमारे (रा. भीमनगर) असे त्या मृत मुलाचे नाव आहे.

दुर्गापूर वेकोलीतर्फे सिवरेज प्लांट तयार करण्यात आला होता. मागील काही महिन्यांपासून तो बंद पडला आहे. त्यातील बहुतांश सामान चोरीला गेले आहे. येथे वेकोलिचे सुरक्षा गार्ड तैनात नसतात. मंगळवारी काही मुले मासे पकडण्याच्या हेतून बंद सिव्हरेजमध्ये गेले होते. यावेळी प्रेम वाघमारे हा पाय घसरून पडला. सिव्हरेजमध्ये पाणी भरून असल्याने त्याला बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मृतदेह वेकोली दुर्गापूरच्या उपविभागीय कार्यालयापुढे ठेऊन घेराव घातला. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून मृतकाच्या कुंटुंबियांना २५ लाख भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा : 

Back to top button