लग्न पत्रिकेतून दिला चंद्रपुरातील ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश

लग्न पत्रिकेतून दिला चंद्रपुरातील ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश
Published on
Updated on

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : लग्नपत्रिका म्हटले की महागडे कार्ड आणि आकर्षक डिझाईनची मागणी असते. प्रत्येक जण आपली लग्नपत्रिका आगळीवेगळी कशी रहावी याचा प्रयत्न करीत असतो. अशीच एक लग्नपत्रिका सध्या चंद्रपूर शहरात चर्चेत आली आहे. समाज माध्यमातून ही लग्नपत्रिका व्हायरल झाली असून सर्वत्र या पत्रिकचे चर्चा आहे. या पत्रिकेतून चंद्रपूर शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला आहे. ही लग्नपत्रिका आगळीवेगळी असली तरी लग्न सोहळ्यात चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक वैभव सांगणारी प्रतिकृती आकर्षकरित्या साकारण्यात आली आहे. सुनील मिलाल असे या लग्नपत्रिका छापणाऱ्या नवरदेवाचे नाव असून, त्याचा विवाह सोहळा शनिवारी (दि. १७) संपन्न होत आहे.

सुनील हा इको प्रो पर्यावरण प्रेमी संस्थेचा कार्यकर्ता आहे. त्याने चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानात सहभाग घेतला होता. यातूनच मिळालेल्या प्रेरणेतून त्याने आपल्या लग्न पत्रिकेत चंद्रपूर शहरातील सर्व ऐतिहासिक वारसाचे जतन व्हावे, यासाठी पत्रिकेमध्ये शहरातील सर्व ऐतिहासिक स्थळांचे छायाचित्र आणि जनजागृती करणारी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, १७ डिसेंबर रोजी होणाऱ्या लग्न सोहळ्यात स्वागतासाठी चंद्रपूरच्या गोंडकालीन वैभवाचे दर्शन घडविणाऱ्या परकोटाची कोरलेली प्रतिकृती साकारणार आहे.

लोकपूर, इंदुपूर या गावापासून चांदा ते चंद्रपूर शहराच्या प्रवासात ऐतिहासिक वारसा निर्माण झाला. पुढे ब्रिटिश राजवट आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर तो जतन व्हावा, यासाठी प्रयत्न झाले. आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर सहकार्य करण्याची गरज आहे. चंद्रपूर शहरांमध्ये प्राचीन आणि गोंडकालीन काळातील अनेक वास्तू आजही आहेत. त्या जिवंत राहिल्या पाहिजेत, यासाठी आपला वारसा आपणच जपूया ही संकल्पना शहरातील सर्व नागरिकांमध्ये रुजवण्याची गरज आहे. हा संदेश नातेवाईकांच्या आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून पोहोचण्याच्या दृष्टीने पत्रिकेच्या रूपाने जनजागृती करण्याचा त्या युवकाचा हा अनोखा प्रयत्न आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news