

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी पात्र २५ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांनी आज (दि.८) माघार घेतली. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात २१ उमेदवार लढणार आहेत. भाजपाचे विजयराज शिंदे, काँग्रेसचे ज्ञानेश्वर पाटील तसेच अपक्ष दिपक जाधव, नामदेव राठोड या चार उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मुख्य लढत पंचरंगी होणार असल्याचे दिसून येत आहे. महायुतीचे प्रतापराव जाधव, महाविकास आघाडीचे नरेंद्र खेडेकर, रविकांत तुपकर (अपक्ष), संदिप शेळके (अपक्ष), वसंत मगर (वंचित बहूजन आघाडी) यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचे चित्र आहे. याबरोबरच गौतम किसन माघाडे, असलम शाह हसन शाह, मच्छिंद्र शेषराव मघाडे, माधव सखाराम बनसोडे, मोहम्मद हसन इनामदार, विकास प्रकाश नांदवे, संतोष भिमराव इंगळे, अशोक वामन हिवाळे, उद्धव ओंकार आटोळे, गजानन जनार्दन धांडे, दिनकर तुकाराम भंडारे, नंदू जगन्नाथ लवंगे, प्रताप पंढरीनाथ पाटील, बाळासाहेब रामचंद्र इंगळे, यांच्यासह बुलढाणा लोकसभा मतदारसंघात रेखा कैलास पोफळकर, सुमन मधुकर तिरपुडे, या दोन महिला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत.
हेही वाचा :