

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा : हिंगोली लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी ४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज (दि. ८) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी १५ अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. भाजपचे बंडखोर रामदास पाटील सुमठाणकर, शाम भारती यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीला दिलासा मिळाला आहे. मात्र, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड. शिवाजी जाधव यांनी मात्र आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने चौरंगी लढत होणार आहे. Hingoli Lok Sabha
अशोक संभाजी ढोले, अशोक पाईकराव, डॉ. आश्विनकुमार सागर, गोविंद वाव्हळ, गंगाधर सावते, दिवाकर माने, धनेश्वर गुरू आनंद भारती, नागोराव पुंजाजी ढोले, नामदेव कल्याणकर, बाजीराव सवंडकर, मनोज देशमुख, राजु वानखेडे, रामदास पाटील, विवेक देशमुख, संजय राठोड यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. Hingoli Lok Sabha
तर आता निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर, बहुजन समाज पार्टीचे गजानन डाळ, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे विजय गाभणे, शिवसेनेचे संभाराव उर्फ बाबुराव कदम, अखिल भारतीय परिवार पार्टीचे अनिल मोहिते, इंडियन नॅशनल लिगचे अल्ताफ अहेमद, बहुजन समाज पार्टी आंबेडकर गटाचे त्रिशला कांबळे, बहुजन मुक्ती पार्टीचे देवसरकर वर्षा शिवाजी, समनक जनता पार्टीचे देशा शाम बंजारा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (ए) चे प्रकाश रणवीर, वंचित बहुजन आघाडीचे बाबु धनु चव्हाण, अभिनव भारत जनसेवा पक्षाचे रवी जाधव, भिम सेनेचे सुनिल इंगोले, राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे हेमंत कनाके तर अपक्ष म्हणून अशोक राठोड, आनंद धुळे, अंबादास गाडे, कदीर मस्तान सय्यद, गोविंद भवर, दत्ता सुर्यवंशी, देवजी असोले, बाबुराव कदम, महेश नप्ते, रवी शिंदे, रामप्रसाद बांगर, रामराव जुमडे, वसंत पाईकराव, अॅड. विजय राऊत, विश्वनाथ फाळेगावकर, शिवाजी जाधव, सर्जेदाव खंदारे, सुनिल गजभार, सत्तार पठाण आदी उमेदवार रिंगणात आहेत.
हेही वाचा