Jalgaon Lok Sabha 2024 | लोकसभेला एसटी महामंडळ ‘लखपती’, 393 बसेस लागणार | पुढारी

Jalgaon Lok Sabha 2024 | लोकसभेला एसटी महामंडळ 'लखपती', 393 बसेस लागणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी निवडणूक शाखेला मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर अधिकारी कर्मचारी बॅलेट युनिट बॅलेट मशीन कंट्रोल युनिट हे पोहोचण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात 393 बसेस लागणार आहे. यासाठी जवळपास 51 लाख रुपये निवडणूक शाखेला एसटी महामंडळाला द्यावे लागणार आहे. त्यामुळे एस टी महामंडळ लखपती होणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा या दोन लोकसभांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे.  मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाने आपली तयारी पूर्ण केलेली आहे. मतदान यंत्रणा याची सरमिसळ पूर्ण झालेली आहे. मतदानात दिवशी मतदान केंद्रांवर मतदान युनिट, बॅलेट युनिट कंट्रोल युनिट व इतर साहित्य व अधिकारी कर्मचारी यांना घेऊन जाण्यासाठी 393 गाड्यांचे नियोजन जिल्हा निवडणूक शाखा कडून करण्यात आलेले आहे.
यासाठी जिल्हा निवडणूक शाखेला एसटी महामंडळाला जवळपास 51 लाख 9 हजार रुपये एसटी महामंडळाला द्यावे लागणार आहे. यामुळे एसटी महामंडळ लखपती होणार आहे.
याचबरोबर या वर्षी 80 वर्षापेक्षा जास्त व असलेले मतदारांना घरीच वोटिंग करता येणारे आहे. यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यासाठी लागणारे गाड्या व यंत्रणा पथके अजून तयारी कागदपत्रे आहे. थोडा वेळ लागणार आहे.

याबाबत जिल्हा निवडणूक शाखेचे अधिकारी अरविंद अंतर्लीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की 393 बसचे नियोजन केलेले आहे. मात्र एसटी महामंडळाला मागणी केल्यास त्यांना काही ॲडव्हान्स द्यावा लागणार आहे.

हेही वाचा –

Back to top button