Bhandara Accident: भरधाव टिप्परने बहीण भावाला चिरडले; गर्भवती बहीण ठार

file photo
file photo
Published on
Updated on

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : शहरातील अत्यंत वर्दळीचा चौक असलेल्या राजीव गांधी चौकात दुचाकीवरून जाणाऱ्या बहीण भावाला भरधाव टिप्परने चिरडले. यात बहिणीचा मृत्यू तर भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. अफसाना शेख (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून त्या गर्भवती होत्या, तर त्यांचा भाऊ कलीम शेख ( वय ४०, रा. जामा मश्चिद परिसर, भंडारा) यांच्या पायाला जबर दुखापत झाली. अपघातानंतर संतप्त जमाव घटनास्थळी पोहोचला. मात्र पोलिसांच्या समयसूचकतेमुळे पुढील अनर्थ टाळला. Bhandara Accident

एमएच ३६ एए ३३८१ क्रमांकाचा टिप्पर गिट्टी घेऊन तुमसरकडे जात होता. राजीव गांधी चौकातून एमएच ३६ टी ९८०१ क्रमांकाच्या दुचाकीवरून अफसाना आणि कलीम हे दोघे घरी जात होते. दरम्यान, राजीव गांधी चौकातील वळणावर टिप्परने दुचाकीला उडविले. टिप्परने दोघांनाही दुचाकीसह सुमारे २० फूट फरफटत नेले. यात अफसाना शेख या महिलेचा मृत्यू झाला. तर कलीम शेख यांच्या पायाचा अक्षरश: चुरा झाला. Bhandara Accident

अपघात घडला तेव्हा चौकात बरीच गर्दी आणि वर्दळही होती. योगायोगाने समोरून येणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला हा प्रकार लक्षात आला.  त्यांनी तातडीने या दोघांनाही एका खासगी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी अफसाना यांना मृत घोषित केले. दरम्यान, अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या टिप्पर चालकाला जमावाने मारहाण केली. त्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान, अपघाताची माहिती पसरताच जमाव चौकात पोहोचला. टिप्परवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी तातडीने धाव घेऊन गर्दी पांगविली. जादा पोलीस कुमक मागवून टिप्पर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला. घटनास्थळाला जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांच्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक बागुल यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news