भाजप मोठा पक्ष पण भंडारा माझा गृहजिल्हा! : प्रफुल्ल पटेल | पुढारी

भाजप मोठा पक्ष पण भंडारा माझा गृहजिल्हा! : प्रफुल्ल पटेल

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महायुतीचे जागावाटप अजून ठरलेले नाही. महायुतीत साहजिकच भाजप मोठा पक्ष आहे. दुसरीकडे भंडारा गोंदिया मतदारसंघात राष्ट्रवादी विदर्भात सर्वाधिक बळकट आहे. माझा हा गृहजिल्हा असल्याने इच्छा असणे स्वाभाविक, पण चर्चा झाल्याशिवाय यासंदर्भात मी वरिष्ठ नेता असल्याने भाष्य करत नाही अशी सावध भूमिका माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी बोलून दाखविली आहे. मिहानमध्ये आर-इंडमर या नव्या सुसज्ज एमआरओच्या निमित्ताने ते माध्यमांशी बोलत होते.

संबंधित बातम्या 

गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात या मतदारसंघात ओढाताण सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा मतदारसंघ असला तरी तो सध्या भाजपच्या ताब्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणुकीला पुढे जात आहोत असे स्पष्ट करताना त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, तीन पक्ष परस्पर साथ देण्याचे ठरविल्यानंतर आपसात कार्यकर्त्यांना काम करावे लागेल, काही दिवस लागतील, चर्चा होईल तेव्हा अधिक स्पष्टपणे बोलू असेही पटेल यावेळी म्हणाले.

राज्यात भाजपचे २३ खासदार १०५ आमदार त्यामुळे त्यांचे वर्चस्व राहिल, मी कुठलाही आग्रह केलेला नाही, पण तो माझा गृह जिल्हा अधिकार असणे स्वाभाविक आहे. यावर पटेल यांनी भर दिला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत असून सदैव निवडणुकीला आम्ही सज्ज आहोत. नुकत्याच आलेल्या निर्णयावर बोलताना स्पीकर हे संवैधानिक पद, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जबाबदारी दिली, मग त्यांच्या निर्णयावर टीकाटिप्पणी नको असेही त्यांनी कुणाचे नाव न घेता विरोधकांना प्रफुल्ल पटेल यांनी खडेबोल सुनावले आहे.

Back to top button