भंडारा : जेल समजून खाल्ले उंदीर मारण्याचे औषध, चिमुकलीचा मृत्यू | पुढारी

भंडारा : जेल समजून खाल्ले उंदीर मारण्याचे औषध, चिमुकलीचा मृत्यू

भंडारा : पुढारी वृत्तसेवा – जेल समजून उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याने दोन वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शहरातील विद्यानगरात घडली. श्रीमयी प्रेम शेंडे (वय २) असे या मुलीचे नाव आहे.

संबंधित बातम्या –

श्रीमयी घरात खेळत होती. दरम्यान घरात उंदीर मारण्यासाठी औषध टाकून ठेवण्यात आली होती. खेळता खेळता श्रीमयीने जेल समजून ती औषध चाटून बघितली. तिची प्रकृती खालावल्याने नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Back to top button