Bhandara Viral Video | मंडईत नृत्यांगणेवर नोटांची उधळण: पं.स सदस्याचा प्रताप; रोहणा येथील व्हिडिओ व्हायरल

नृत्यांगनेवर पंचायत समिती सदस्य देवा चकोले यांनी नोटांची उधळण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल
AI Image
AI Image AI Image
Published on: 
Updated on: 

Mohadi Panchayat Samiti Member Showering Cash on Dancer

भंडारा:
जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असताना मोहाडी तालुक्यातील रोहणा येथील मंडई कार्यक्रमातील एका प्रकाराची सध्या चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमात नृत्य सादर करणाऱ्या नृत्यांगनेवर पंचायत समिती सदस्य देवा चकोले यांनी नोटांची उधळण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

चकोले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते असून, मोहाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती आहेत. रोहणा येथे आयोजित मंडई महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान नृत्यांगनेचे सादरीकरण सुरू असताना चकोले तिच्यावर नोटा उधळताना व्हिडिओमध्ये दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

AI Image
Bhandara ST Depot News | रात्रीच्या अंधारात मुलींना रस्त्यावर सोडले; भंडारा आगारातील दोन एसटी कर्मचारी निलंबित

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पातळीवर या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. पीक नुकसानीमुळे शेतीचे आर्थिक गणित कोलमडले असून, शासकीय मदतीची प्रतीक्षा असलेल्या शेतकरी कुटुंबांसमोर अनेक प्रश्न आहेत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी सार्वजनिक कार्यक्रमात पैशांची उधळण करताना दिसत असल्याने त्यांच्या सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेबाबत चर्चा होत आहे.

सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तींच्या वर्तनाकडे नागरिकांचे लक्ष असते. त्यामुळे अशा प्रसंगांकडेही संवेदनशीलतेने पाहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मंडईसारख्या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मनोरंजनाचे विविध प्रकार सादर केले जातात.

AI Image
Bhandara Shocking News : एसटीमध्ये प्रवासी नसल्याचे कारण देत दोन विद्यार्थिनींना अंधारातच उतरविले! मुलींची सुरक्षितता वाऱ्यावर

मात्र, त्यात लोकप्रतिनिधींच्या सहभागाचे स्वरूप आणि सार्वजनिक प्रतिमेचा विचारही महत्त्वाचा ठरतो. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओमुळे या घटनेची चर्चा राजकीय वतुर्ळातही सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.