Bhandara ST Depot News | रात्रीच्या अंधारात मुलींना रस्त्यावर सोडले; भंडारा आगारातील दोन एसटी कर्मचारी निलंबित

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून घटनेची गंभीर दखल
MSRTC  Suspended
MSRTC Suspended (Pudhari Photo)
Published on: 
Updated on: 

MSRTC Bus Conductor Driver Suspended

भंडारा:
एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना रात्रीच्या वेळी अंधारात रस्त्यावर उतरविल्याच्या घटनेची परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी तातडीने चौकशी करून संबंधित चालक आणि वाहक यांना सोमवारपासून (दि.१६) निलंबित करण्यात आले आहे.

१४ नोव्हेंबर रोजी भंडारा आगाराच्या एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना रोहा येथे रात्रीच्या वेळी अंधारात बसमधून उतरविण्यात आल्याचे समोर आले होते. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. या घटनेची तातडीने दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

MSRTC  Suspended
Bhandara Shocking News : एसटीमध्ये प्रवासी नसल्याचे कारण देत दोन विद्यार्थिनींना अंधारातच उतरविले! मुलींची सुरक्षितता वाऱ्यावर

त्यानुसार भंडारा विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक यांच्यामार्फत प्राथमिक चौकशी करण्यात आली. या चौकशीत संबंधित चालक अनिल सावरे आणि वाहक उदेभान मेश्राम यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. तसेच महामंडळाच्या शिस्त व आवेदन कार्यपद्धतीनुसार त्यांच्याविरुद्ध पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी विशेषत: शालेय विद्यार्थी आणि अल्पवयीन प्रवाशांच्या सुरक्षिततेची अधिक काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी एसटी प्रशासनाची आहे. कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी स्वत:च्या मुलांप्रमाणे संवेदनशीलतेने वागावे, अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात एसटी प्रशासनाने आवश्यक त्या परिपत्रकीय सूचना तातडीने निर्गमित कराव्यात, असेही त्यांनी निर्देशित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.