भंडारा : शिवशाही- दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू | पुढारी

भंडारा : शिवशाही- दुचाकी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

भंडारा; पुढारी वृत्तसेवा : शिवशाही बस व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तरूणाचा मृत्यू झाला. हा अपघात मोहाडी येथील सुलोचनादेवी पारधी विद्यालयासमोरील राज्य मार्गावर गुरुवारी (दि.२२) सायंकाळी सव्वाआठच्या सुमारास घडला. राहुल नंदू मेश्राम (वय ३०, रा. हरदोली ) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नागपूरहून तुमसरकडे येत असलेल्या शिवशाही बसची समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात राहुल मेश्राम या तरूणाचा मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की, बसच्या समोरील एका बाजूचा भाग तुटून पडला. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी राहूलला रुग्णालयात दाखल केले होते, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पुढील तपास मोहाडी पोलिस करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button