Avalanche in Gulmarg | गुलमर्गमध्ये हिमस्खलनात परदेशी पर्यटकाचा मृत्यू | पुढारी

Avalanche in Gulmarg | गुलमर्गमध्ये हिमस्खलनात परदेशी पर्यटकाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मीरमधील गुलमर्ग येथे हिमस्खलनात काही पर्यटक अडकून पडले आहेत. या घटनेत एका परदेशी पर्यटकाचा मृत्यूही झालेला आहे. लष्कराच्या मदतीने पाच पर्यटकांना वाचवण्यात यश आलेले आहे. गुलमर्गमध्ये खेलो इंडिया हिवाळी स्पर्धा सुरू आहेत, त्याती ही दुर्घटना घडली आहे.

जिल्हा आपत्ती विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुलमर्ग येथे दुपारी २च्या सुमारास हिमस्खलनाची घटना घडली, यात तीन परदेशी पर्यटक अडकून पडले होते. तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे, तर एक पर्यटक बेपत्ता आहे. गुलमर्ग येथील काँगदूर उतारावर ही घटना घडली आहे. मृत पर्यटक येथे स्किईंगसाठी गेलेला होता.

हेही वाचा

Back to top button