भंडारा : वादातून धारदार शस्त्राने छातीवर व गळ्यावर वार करून केली तरुणाची निर्घृण हत्या

भंडारा : वादातून धारदार शस्त्राने छातीवर व गळ्यावर वार करून केली तरुणाची निर्घृण हत्या
Published on
Updated on

भंडारा,पुढारी वृत्‍तसेवा : भंडारा जिल्‍हातील तुमसर शहरातील माकडे नगर येथे अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून तरुणाची निर्घृण हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 12) सायंकाळी 5.30 च्या सुमारास घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मोनू विणू गेडाम (वय २५) रा. आंबेडकर नगर, तुमसर असे मृताचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी मोनू याने सलून व टॅटूचे दुकान सुरू केले होते. घटनेच्या वेळी मोनू गेडाम हा आपल्या दुकानासामोर बसला असता अचानक काही तरुण तेथे आले. त्‍योवळी त्‍यांच्यात वाद झाले. दरम्‍यान अज्ञात आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने छातीवर व गळ्यावर वार केले. त्‍यावेळी तो जागीच ठार झाला.

त्‍याच्या दुकानापासून काही अंतरावर असलेल्‍या दुकानातून पेपरमध्ये मिर्ची पावडर घेण्यात आली होती. यावरून त्‍याला मारण्यापूर्वी त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज आहे. कोणत्या कारणासाठी त्याचा खून झाला हे अद्याप समोर आले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्‍यान आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर करत आहेत.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news