अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण सुप्रिया सुळेंच्या नाही; राज ठाकरेंचा खोचक टोला | पुढारी

अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण सुप्रिया सुळेंच्या नाही; राज ठाकरेंचा खोचक टोला

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकाच घरात राहून अजित पवार यांच्यावर रेड पडते मग सुप्रिया सुळे यांच्यावर का पडत नाही? असा घणाघाती टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लगावला. ठाणे येथील ‘उत्तर’सभेत त्यांनी ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले की, अजित पवार यांच्यावर रेड पडते. अजित पवारांच्या सख्ख्या बहिणींच्या घरावर रेड पडते. पण एकाच घरात राहून सुप्रिया सुळे यांच्या घरी रेड पडत नाही. सुप्रियांचे खायचे दात वेगळे, आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

गुडीपाडव्याच्या सभेत भोंग्याचा मुद्दा उपस्थित करून राजकीय वातावरणात भोंगा लावून सोडलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यातून उत्तर सभेतून प्रत्युत्तर दिले. त्यांनी सुरुवातीलाच शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत भाषणाची दिशा स्पष्ट केली.

ते म्हणाले की, पोलीसांचा दुपारी फोन आला होता, माझ्या ताफ्याला कोणीतरी येणार आहे हे इंटेलिजन्सला कळलं मात्र शरद पवार यांच्या घरी जाणार हे माहीत नव्हतं. गुडीपाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी अकलेलचे तारे तोडले, त्यानंतर उत्तर देणं गरजेचं आहे. मात्र मला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायच नव्हतं कारण काही पत्रकार काही पक्षाला बांधील आहेत ते पण शिरतात आणि मूळ विषय बाजूला राहतो.

गेल्या निवडणुकीच्या वेळी बहुमत आल्यानंतरही तुम्ही नागरिकांची प्रतारणा केली. नरेंद्र मोदी यांच्यावर उघडपणे बोललो. ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला ही खोटी अफवा पसरवल्याचा आरोप त्यांनी केला.

Back to top button