राज्य सरकारने जी कामे केली नाहीत ती मनसेने केली : वसंत मोरे | पुढारी

राज्य सरकारने जी कामे केली नाहीत ती मनसेने केली : वसंत मोरे

ठाणे, पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ठाणे येथे आज (दि. १२) मनसेच्या उत्‍तर सभेच्या सुरूवातीला वसंत मोरे यांचे भाषण झाले. यावेळी ते म्‍हणाले, कोरोना काळात फक्‍त मनसेची दारे उघडी आहे. या काळात मनसेने लोकांना सर्व प्रकारची मदत केली. महापालिकेत मनसेचे दोनच नगरसेवक होते, परंतु 100 जणांना जे जमले नाही ते आम्ही दोन नगरसेवकांनी केले.

ते म्‍हणाले, मनसेचे दोन नगरसेवक आहेत. परंतु आमची कामे कात्रज आणि कोंढवा भागात येवून पहावी. तसेच कोरोना काळात हे सरकार अपयशी ठरले आहे. आम्‍ही कोविड सेंटर उभे केले. तर आपली कामे सामान्य जनतेपर्यंत पोहचली पाहीजेत, असे कामे करावीत, असे त्‍यांनी सांगितले.

दरम्‍यान, 100 नगरसेवकांनी जी कामे केली नाहीत ती कामे फक्‍त दोन नगरसेवकांनी करून दाखवली आहेत. ब्‍लू प्रिंटच्या माध्यमातून पुण्यात 16 महिन्यात 16 उदृाने साकारणारे आम्‍ही एकमेव आहोत. तर आमची कामे बघून आम्‍हाला भाजपात येण्यासाठी आवाहन केले होते, दरम्‍यान आम्‍ही भाजपच्या नेत्‍यांना धूळ चारून गेली 15 वर्षी सत्‍तेत आहोत, असे बोलवणा-यांना स्‍पष्‍ट शब्‍दात सांगितले. तर शेवटी ते म्‍हणाले, राज ठाकरे जे आदेश देतील ते त्‍याप्रमाणे आपण सर्वजण कामे करूया, असेही मोरे म्‍हणाले.

 

Back to top button