मराठा – ओबीसी हा वाद आता शांत झाला पाहिजे. महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे. मराठवाड्यातील मराठा हा कुणबी आहे. त्यामुळे जरांगे यांची मागणी रास्त आहे. सगळे मराठे ओबीसी मध्ये आले, तर सध्या असलेल्या ओबीसीमध्ये अडचण निर्माण होईल, हा जो संशय आहे, तो देखील काही प्रमाणात वास्तविक आहे. मात्र, जरांगे आणि छगन भुजबळ यांनी एकत्र येऊन दिल्ली समोर लढा उभारला पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.