Amravati Crime रतवाडा अश्लील व्हिडिओ प्रकरण ; मानव सुगंधेला उच्च न्यायालयाकडून जामीन, अद्याप एकही पीडित पुढे नाही

मात्र तपास अद्याप सुरू असून आरोपपत्र दाखल होणे बाकी असल्याचेही नमूद करण्यात आले
Crime News
Crime NewsPudhari
Published on
Updated on

अमरावती : परतवाडा पोलीस ठाणे हद्दीत नोंद झालेल्या बहुचर्चित अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २० वर्षीय संशयित आरोपी मानव दीपकराव सुगंधे याला नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आतापर्यंत कोणतीही कथित पीडित युवती अथवा अल्पवयीन मुलगी अधिकृतरीत्या पुढे आलेली नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Crime News
Crime News : तू माझी नाही झालीस, तर कोणाचीच होऊ देणार नाही

प्रकरणातील माहितीनुसार, परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९१/२०२६ दाखल करण्यात आला होता. टेलिग्राम अ‍ॅपवर काही युवती व अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ त्यांच्या संमतीशिवाय प्रसारित करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर भारतीय न्याय संहिता, पॉक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Crime News
Crime News: डोंबिवलीत लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या दोन्ही मुली गर्भवती; दोघांना बेड्या

आरोपी मानव सुगंधे याच्या वतीने न्यायालयात मांडण्यात आले की, त्याला केवळ सहआरोपीच्या जबाबाच्या आधारे या प्रकरणात गोवण्यात आले आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करणे किंवा प्रसारित करणे यामध्ये त्याचा कोणताही थेट सहभाग असल्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. तो २० वर्षीय विद्यार्थी असून त्याच्या परीक्षा २० जूनपासून सुरू होणार असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सरकारी पक्षाने जामिनाला विरोध करताना मुख्य आरोपी अयान अहमदचा मित्र असल्याने मानवने कथितरित्या खोलीची व्यवस्था करून दिल्याचा आरोप केला. मात्र तपास अद्याप सुरू असून आरोपपत्र दाखल होणे बाकी असल्याचेही नमूद करण्यात आले.

Crime News
Crime News: वेब सीरिज पाहून प्लॅन, पाच महिने तयारी आणि जळालेली कार; अल्पवयीन मुलाने कुटुंबातील चौघांची हत्या कशी केली?

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती एम. एम. नेरलिकर यांनी निरीक्षण नोंदविले की, तपास यंत्रणेने आरोपीविरुद्ध अद्याप कोणतेही ठोस पुरावे सादर केलेले नाहीत. तसेच त्याला मुख्यत्वे सहआरोपीच्या जबाबाच्या आधारे आरोपी करण्यात आले आहे.आरोपीचे वय, शैक्षणिक स्थिती आणि आगामी परीक्षा विचारात घेऊन न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक मुचलका व तितक्याच रकमेच्या दोन जामीनदारांवर त्याची सुटका करण्याचे आदेश दिले.bतसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये, पुराव्यांशी छेडछाड करू नये, पोलिसांना आपला पत्ता व मोबाईल क्रमांक उपलब्ध करून द्यावा आणि प्रत्येक सोमवारी संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावावी, अशा अटीही न्यायालयाने घातल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news