Crime News : तू माझी नाही झालीस, तर कोणाचीच होऊ देणार नाही

तरुणीचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या आरोपीला २५ मेपर्यंत कोठडी
Sambhajinagar Crime News
Crime News : तू माझी नाही झालीस, तर कोणाचीच होऊ देणार नाहीFiIle Photo
Published on
Updated on

If you don't become mine, I won't let you become anyone else's

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : माझ्याशी लग्न केले नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला मारून टाकीन, अशी धमकी देत खासगी रुग्णालयात कार्यरत २२ वर्षीय नर्सचा सातत्याने पाठलाग करणाऱ्या तरुणाला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली. शंकर कुंडलिक बारगजे (२५, रा. विहामांडवा, ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे. त्याला २५ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आर. उबाळे यांनी दिले.

Sambhajinagar Crime News
MD drugs seizure : मसनतपूर भागात एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

प्रकरणात पीडित तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार, पीडिता ही खासगी रुग्णालयात स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. २०२३ मध्ये महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान तिची आरोपीशी ओळख झाली होती. मित्राच्या माध्यमातून झालेली ओळख पुढे एकतर्फी प्रेमात बदलली. मात्र तरुणीने स्पष्ट नकार दिल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. तू माझ्याशी बोलली नाहीस तर दुसऱ्याशी लग्न करू देणार नाही, अशी धमकी देत तो वारंवार त्रास देत होता, असे फिर्यादीत नमूद आहे.

२० मे रोजी सकाळी पीडिता रुग्णालयात ड्युटीसाठी जात असताना आरोपी तेथेच थांबून होता. त्याने तिचा हात पकडून मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यानंतर त्याने पीडितेचा विनयभंग केला तसेच ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर तरुणीने क्रांतीचौक पोलिस ठाण्यात धाव घेत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पीडितेने दिलेल्या पुरवणी जबाबात, आरोपीने यापूर्वी दगड उचलून पीडितेला मारण्याचा प्रयत्न केला होता, तसेच तिच्या वडिलांवर देखील चाकूने वार करून जखमी केले होते, असे फिर्यादीत नमूद आहे.

Sambhajinagar Crime News
बलात्काराची तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेच्या पतीला पोलिसाची मारहाण ?

पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता सहायक लोकाभियोक्ता के.एन. पवार यांनी आरोपीने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करायची आहे. आरोपीला गुन्ह्यात कोणी मदत केला याचा तपास करायचा असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

शंकर बारगजे याच्याविरुद्ध उस्मानपुरा आणि क्रांतीचौक पोलिस ठाण्यात यापूर्वी विनयभंग, धमकी व पाठलागाचे गुन्हे दाखल आहेत. वारंवार तक्रारी होऊनही त्याच्या वर्तनात सुध- ारणा झाली नसल्याचे पोलिस तपासात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news