Crime News: डोंबिवलीत लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या दोन्ही मुली गर्भवती; दोघांना बेड्या

अल्पवयीन तरूणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
Crime News
Crime NewsPudahri
Published on
Updated on

डोंबिवली: कल्याण-डोंबिवलीतील महिलांसह अल्पवयीन तरूणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याणच्या रेल्वे यार्डात नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या भागांत अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे पोलिस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांतून उघडकीस आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या दोही मुली गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मानपाडा आणि रामनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत या दोन्ही मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Crime News
Murbad truck accident: महामार्गालगतच्या उघड्या नाल्यात ट्रक कोसळला

मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर आरोपी काजू निषाद (23) हा उत्तरप्रदेशात पसार झाला. अलीकडे पिडीत मुलगी गर्भवती राहिल्याचे तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले. पिडीत मुलीला सोबत घेऊन कुटुंबीयांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे यांनी पिडीत मुलीला धीर देऊन या प्रकरणातील आरोपीला शोधून काढण्यासाठी पथकाला मार्गदर्शन केले. पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे काजू निषाद याचा माग काढत त्याला उत्तरप्रदेशातून बेड्या ठोकल्या.

कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी काजू निषाद सध्या पोलिसांच्या ताब्यात असून अधिक तपास करण्यात येत आहे.

दुसऱ्या घटनेत रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शुभम सरोज (24) याने तिच्याशी वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केले. पंधरा ते सोळा वर्षीय असलेल्या या मुलीने त्याला विरोधही केला होता. आरोपी शुभम सरोज हा खासगी व्हिडिओग्राफीचे काम करतो.

Crime News
Bhayandar Kidnapping Case: मैत्रीणीशी प्रेमसंबंधाच्या संशयावरून तरुणाचे अपहरण

त्याने केलेल्या लैंगिक शोषणामुळे पिडीत मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार वैद्यकीय तपासणीनंतर लक्षात आल्यावर तिच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. शनिवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात धाव घेऊन घरच्यांनी आपल्या मुलीवर बेतलेल्या प्रसंगाची माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी कुटुंबीयांसह पिडीत मुलीला धीर दिला.

त्यानंतर मात्र वेळ न दवडता वपोनि जवादवाड यांनी एकीकडे पिडीत मुलीच्या जबानीवरून गुन्हा नोंदविण्याच्या सूचना दिल्या. तर दुसरीकडे तपास चक्रांना वेग देण्यासाठी निवडक पथकाला आरोपीचा शोध घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यानुसार पोलिसांनी शोध घेऊन शुभम सरोज याला अटक केली. रविवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नराधमांवर कठोर कारवाईची मागणी

या दोन घटनांपूर्वी अहिल्यानगरहून खोपोलीत राहणाऱ्या मामाकडे जाण्यासाठी निघालेल्या 14 वर्षीय मुलीवर सौरभ सोनवणे याने अत्याचार केल्याची घटना घडली होती. गेल्या चोवीस तासांत कल्याण-डोंबिवली परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आल्याने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एकीकडे या तिन्ही प्रकरणांचा पोलिस कसून तपास करत आहेत. तर दुसरीकडे या तिन्ही नराधमांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी कल्याण-डोंबिवलीकरांकडून पुढे आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news