अमरावती: सावत्र बापाचा पंधरा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग

अमरावती: सावत्र बापाचा पंधरा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग
Published on
Updated on

अमरावती: पुढारी वृत्तसेवा : सावत्र बापाने पंधरा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात वरुड पोलिसांनी आरोपी विरोधात बाल-लैंगिक अत्‍याचार प्रतिबंध कायद्या ( पोस्को ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पीडित मुलीची आई  मोठ्या मुलीच्‍या सासरी गेली होती. त्यामुळे पीडिता सावत्र बापासोबत घरात एकटीच होती. १ जानेवारी रोजी मुलगी घरातील कामे आटोपून हॉलमध्ये बसली असताना सावत्र बापाने तिला धमकी देत अतिप्रसंग केला. या घटनेची माहिती दिल्‍यास पीडित मुलीला जीवे मारण्‍याची धमकी दिली. त्यानंतर ६ जानेवारीपर्यंत त्याने मुलीवर वारंवार अतिप्रसंग केला. आई परत आल्यानंतर मुलीने अत्‍याचाराची माहिती दिली. आईने दिलेल्‍या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी विरोधात बाल-लैंगिक अत्‍याचार प्रतिबंध कायद्या ( पोस्को ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news